"शॉर्ट सेल" हा काय प्रकार असतो ?
मागे "हिंडेनबर्ग रिसर्च" या अमेरिकन संस्थेने "अदानी" चे शेअर "शॉर्ट " केले होते. .तेव्हा "अदानी" ग्रुप चे जेवढे शेअर आहेत ते मोठ्या प्रमाणावर कोसळत होते. यावर मी पोस्ट लिहिली होती. तेव्हा "व्हॉट्स अप" वर मला प्रश्न विचारण्यात आला होता की हा "शॉर्ट सेल" काय प्रकार असतो ???
शेअर मार्केट हे जरा गुंतागुंतीचे क्षेत्र असल्याने नवीन माणसाला समजायला कठीण असते. "शॉर्ट सेल" म्हणजे जेव्हा आपल्याला वाटते की ,एखाद्या कंपनी चे भाव उतरणार आहेत, तेव्हा तुम्ही "चढ " भावाला विकून "कमी" भावाला खरेदी करू शकता.. प्रथम वस्तू विकणार आणि मग तीच वस्तू खरेदी करणार...?? अजब आहे ना !!
आपण सामान्य बाजारात ही गोष्ट प्रथम समजून घेऊ.. समजा एखाद्याचे मोबाईल चे दुकान आहे. ज्याचे दुकान आहे त्या विक्रेत्याने मोबाईल ज्या किमतीला विकत घेतले असणार ,त्यापेक्षा जास्त किमतीला तो ते मोबाईल विकणार ,तेव्हा त्याला नफा होणार . साधी गोष्ट आहे !!. कुठलाही बिझनेस असाच चालतो...कमी किमतीला खरेदी करून जास्त किमतीला विकणे आणि नफा मिळवणे. पण मी आता असा प्रश्न विचारला की , प्रथम विक्रेत्याने ती वस्तू (मोबाईल) प्रथम विकली (जी त्याने खरेदी केलेली न्हवती), आणि नंतर त्याने ती खरेदी केली आणि नफा घेतला...म्हणजे उलट केले....तर तुम्ही म्हणाल की हे अजिबात शक्य नाही..
सामान्य बाजारात हे शक्य नाही, पण शेअर बाजारात हे शक्य आहे...शेअर बाजारात "शेअर" ही वस्तू आहे.. ते खरेदी करून विकू शकता आणि विक्री करून नंतर खरेदी पण करू शकता... दोन्ही मार्ग आहेत..ब्रोकर (दलाल) हा तात्पुरता स्वरूपात म्हणजे एक दिवस साठी तुम्हाला शेअर उपलब्ध करून देतो.. ते शेअर प्रथम तुम्ही विकायचे आणि मार्केट बंद होण्यापूर्वी सक्तीने (compulsary) ते खरेदी करायचे असते.. यात मार्केट खाली कोसळले तर तुम्हाला नफा होतो आणि जरा मार्केट चे भाव वाढले तर तुम्हाला तोटा होतो.. या प्रकारास "शॉर्ट सेल" म्हणतात..पण हा धोकादायक प्रकार असतो.. यात कोसळत्या मार्केट मध्ये फक्त एक दिवस साठी नफा मिळवण्याची संधी दिली जाते...
हिंडेनबर्ग संस्था ही विशेष म्हणजे यावर काम करते. ते एखाद्या कंपनीचा सखोल अभ्यास करतात. कंपनी मध्ये काही गैरव्यवहार दिसत असले तर ते त्यावर माहिती प्रसिद्ध करतात.. आणि हे स्पष्ट जाहीर करतात की या कंपनीचा हा प्रॉब्लेम आहे व आम्ही या कंपनीचे शेअर विकतो आहोत.
मग साहजिकच परदेशी गुतवणुकदार घाबरून ते शेअर विकणार. त्यामुळं त्या शेअर चे भाव खाली येणार. हिंडेनबर्ग संस्था याच संधीचा फायदा घेवून कोसळत्या मार्केट मध्ये "शॉर्ट पोझिशन " घेणार... हिंडेनबर्ग संस्था ने अदानी चे शेअर हे भारताबाहेर अमेरिकन मार्केट मध्ये "शॉर्ट " केले होते.. आता तुम्हाला "शॉर्ट सेल" काय असते हे समजले असेलच...
डॉ अलोक कदम
Comments
Post a Comment