Hello Friends, My mission is to educate the people. This is One of The Platform, where you can get the information of Various Fields in Marathi (one of the indian language). I am doing Research, Studying and Writing the various scientific and Authentic Information. The Students or Individual from anywhere ,can easily understand the " Basic Concepts " in their Mother tongue. These blog's have emphasis on Development of " scientific Temper " or " an attitude of reasoning and questioning " on different things in the people of India. Thank you
जीवनसत्व
जीवनसत्वे (व्हिटॅमिन) ही आपल्या शरीरात अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतात. आज या लेखात आपण फक्त "जीवनसत्व" विषयी माहिती पाहणार आहोत. जीवनसत्वे (व्हिटॅमिन) हा काय प्रकार असतो ? आरोग्याच्या दृष्टीने ते का महत्वाचे आहेत हे आपण यात पाहणार आहोत.
जीवनसत्व हे नावाप्रमाणे जीवनातील अत्यंत महत्वाचे पोषक तत्व आहे. जीवनसत्व ची कमतरता असेल तर बऱ्याच आजारांना निमंत्रण असते. जीवनसत्वे ही आपल्या वाढीसाठी, प्रजनन साठी, शरीरातील जीवरासायनिक क्रियासाठी आवश्यक असते.
जीवनसत्वे ही "मायक्रोन्यूट्रीअन्ट्स" (micronutrients) या विभागातील अन्नघटक आहेत.. प्रथिने ,कर्बोदके, स्निग्ध पदार्थ हे मॅक्रोन्यूट्रीअन्ट्स (macronutrients) या विभागात येतात. प्रथिने ही शरीराच्या वाढीसाठी आणि ऊर्जा मिळवण्यासाठी आवश्यक असतात, हे आपल्याला माहीत आहे. प्रथिने ,स्निग्ध पदार्थ, कर्बोदके यांच्यापासून ऊर्जा निर्माण होण्यासाठी विशेष प्रकारचे "जीवरासायनिक क्रिया " असतात. त्यात, पाणी आणि क्षार आवश्यक असते, सोबत "जीवनसत्व" देखील आवश्यक असते.. जीवनसत्व हे यांना जीवरासायनिक क्रियेत "कोएनझायम व कोफॅक्टर" म्हणून मदत करतात. जीवनसत्वे हे शरीरात नसते तर इतर अन्नघटक पासून शरीरात ऊर्जा आणि वाढ होण्याची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नसती.
जीवनसत्वे हे कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन पासून बनलेले सेंद्रिय संयुगे ( ऑरगॅनिक कम्पौंड) आहेत. प्रथिने (protein) ही देखील "सेंद्रिय संयुगे" च आहेत. मात्र प्रथिने ही "अमीनो असिड" पासून बनलेले "पोलिपेप्ताईड" आहेत. याउलट, जीवनसत्वे हे वेगळे रासायनिक घटक आहेत. हे "अमीनो असिड" पेक्षा वेगळे घटक आहेत.. 1912 मध्ये बायोकेमिस्ट "कस्मियार फंक" या शास्त्रज्ञांनी सर्वप्रथम "जीवनसत्व" या गोष्टीची जगाला ओळख करून दिली. जीवनासाठी आवश्यक असे केमिकल असे या पदार्थला ओळखले गेले. "Vitamine" असे नाव त्यांनीच दिले होते.
आपण बहुपेशीय सजीव आहोत. आपल्या शरीरात अब्जावधी पेशी कार्य करतात, तेव्हा एकूण आपल्या शरीराचे कार्य होत असते. अन्नघटक पासून ऊर्जा तयार करण्याच्या प्रक्रियेत प्रत्येक पेशी ही आपले कार्य करत असते. यात प्रक्रियेत जीवनसत्व मदत करतात. जीवनसत्वे हे शरीराच्या वाढीसाठी आवश्यक असतात. हाडे, दात,डोळे, त्वचा, मांस , ग्रंथी, हिरड्या, रक्त अशा महत्वाच्या भागासाठी , तसेच रोगप्रतिकारशक्ती साठी आवश्यक असते. शरीरातील सर्व क्रिया सुरळीत राहण्यासाठी (maitainanace) आवश्यक असते. लहान बाळाच्या वाढीसाठी जीवनसत्व आवश्यक असते. यांचे विविध कार्य आहेत जे आपण पुढील लेखात प्रत्येक जीवनसत्व ला स्वतंत्रपने समजून घेवू.
जीवनसत्वे हे त्याच्या विरघळ्याच्या गुणधर्म प्रमाणे दोन प्रकारचे असतात. एक "पाण्यात विरघळणारे" आणि दुसरे "स्निग्ध पदार्थ (fat)विरघळणारे" असे हे प्रकार आहेत.. जीवनसत्वे "ब" समूह आणि "क " जीवनसत्वे ही पाण्यात विरघळतात.
याउलट, जीवनसत्वे "अ" "ड" "ई" "के" हे "स्निग्ध पदार्थ" मध्ये विरघळतात.
- जीवनसत्व "अ"
- जीवनसत्व "ब " समूह
- जीवनसत्व "क"
- जीवनसत्व "ड"
- जीवनसत्व "ई"
- जीवनसत्व "के"
"पाण्यात विरघळणारी जीवनसत्व" ही फार काळ शरीरात टिकत नाही. मात्र , "स्निग्ध पदार्थ मध्ये विरघळणारे" जीवनसत्व ही शरीरात फार काळ टिकतात. स्निग्ध पदार्थ मध्ये विरघळणाऱ्या जीवनसत्वे ची कमतरता भरून काढण्यास उशीर लागतो . पाण्यात विरघळणारी जीवनसत्व म्हणजे ब आणि क यांची कमतरता ही तुलनेने लवकर भरून काढता येते.
जीवनसत्वे ही वनस्पती आणि प्राणी यांच्या पासून आपल्याला मिळतात.वनस्पती हे जीवनसत्वे ची निर्मिती करू शकतात. मात्र प्राणी हे जीवनसत्वे ची निर्मिती करू शकत नाही. फक्त जीवनसत्व "ड" हे याला अपवाद आहे. सूर्यप्रकाश चे साहाय्याने "ड" जीवनसत्व शरीरात तयार होते. प्राण्यांना बाहेरून जीवनसत्वे घ्यावी लागतात.मांसाहार मध्ये देखील आपल्याला जीवनसत्वे मिळतात. शाकाहार मध्ये मोठ्या प्रमाणावर जीवनसत्व असतात. शाकाहार आणि मांसाहार मध्ये कोणते जीवनसत्वे कशात असतात हे आपण प्रत्येक आपण पुढील लेखात पाहू.
जीवनसत्वच्या कमतरतामुळे जे आजार निर्माण होतात, हे कोणते जीवनसत्व कोठे काम करत आहे यावर अवलंबून असते. जीवनसत्वे जर विशेष काम करत आहेत ,तर त्याची कमतरता ही त्या विशेष कामाला करू देणार नाही. काही जीवनसत्वच्या कमतरताकडे दुर्लक्ष केले गेले ,तर गंभीर आजार होऊ शकतो.. आपण रोजच्या आहारात जीवनसत्वे घेतो का हे तपासणे खूप आवश्यक असते. देशाला सुदृढ बनवायचे असेल तर लोक सुदृढ असणे आवश्यक आहे. लहान मुले ही पोषक द्रव्य न मिळाल्याने कमजोर होत असतील आणि त्यांची रोगप्रतिकारशक्ती कमजोर असेल तर आपल्याला त्यांच्या आहारावर लक्ष द्यावे लागेल.. नुसती औषधे घेण्यात काही अर्थ नसतो. आहार देखील तितकाच महत्वाचा असतो. जर आहारातून जीवनसत्वे भरून निघणार नसतील तिथे डॉक्टर च्या सल्याने औषध घेणे गरजेचे आहे. यांसाठी जनजागृती म्हणून जीवनसत्ववर खास लेखमाला सुरू केली आहे. त्यातील हा पहिला लेख आहे. इतर लेख देखील इथे उपलब्ध होतील.
डॉ अलोक कदम
Comments
Post a Comment