समांतर ब्रम्हांड (Parallel universe)
समांतर ब्रम्हांड ही एक अद्भुत संकल्पना आहे. गेल्या काही वर्षात जेव्हा पासून कवांटम मेकॅनिक (quantum mechanics ) मध्ये अधिकाधिक संशोधन होत गेले , माणसाचे ब्रम्हांड कडे पाहण्याचा दृष्टिकोन पण बदलत गेला.. ब्रम्हांड हे एक रहस्य आहे. विज्ञानाने ब्रम्हाडचे रहस्य शोधायचा कितीही प्रयत्न केला ,तर हे ब्रम्हांड सदैव एक रहस्य म्हणून शिल्लक राहील, कारण सृष्टीला अंत नाही.. सृष्टी ही एक कोड किंवा रहस्य आहे.
आपण ज्या ब्रम्हांड ला ओळखतो ते ब्रम्हांड हे "बिग बँग" या महाविस्फोट पासून तयार झाले आहे, ही आतापर्यंतची माहिती आहे.. पण तरीही अनेक प्रश्न या अनुषगाने निर्माण होतात त्यातील एक प्रश्न असा की , "बिग बँग" पूर्वी काय होते ?? आपल्या ब्रम्हांड पलीकडे देखील ब्रम्हांड आहे का ?? जर ब्रम्हांड असेल तर त्याचा आणि आपल्या ब्रम्हांड चे काही संबंध आहे का ? किती ब्रम्हांड असतील ? एक महाकाय सिस्टीम च आपला ब्रम्हांड हा एक छोटासा भाग तर नसेल ?? असे अनेक प्रश्न निर्माण होतात..
समांतर ब्रम्हांड ही अशी संकल्पना आहे, की त्यात असे म्हटले आहे की आपल्या ब्रम्हांड ऐवजी अनेक ब्रम्हांड सृष्टीमध्ये असू शकतात. आपल्या ब्रम्हांडात जसे दीर्घिका, दीर्घिका चे समूह, तारे, ग्रह इत्यादी खगोलीय गोष्टी आहेत, तसे इतर ब्रम्हांडात पण हे सर्व असेल.. तिथेही आपल्या सारखी पृथ्वी असेल. तिथेही असलेल्या पृथ्वी वर माणूस असेल . एवढंच न्हवे आपला सारखे दिसणारे लोक पण असतील.. ही संकल्पना आहे. सायन्स फिक्शन चित्रपट बघितला सारखे वाटते ना !! पण ही संकल्पना ही संकल्पना न राहत हे वास्तव सत्य म्हणून शास्त्रज्ञ सिद्ध करू शकतात...कारण सृष्टी मध्ये कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नाही प्रत्येक गोष्टीचे वेगवेगळी शक्यता असते....
समांतर ब्रम्हंड ही संकल्पना आपण उदाहरण देऊन स्पष्ट करूया. समजा एक मुलगा अभ्यासात हुशार आहे आणि मुझिक मध्ये पण पारंगत आहे. आता तो मोठा झाल्यावर त्याच्याकडे दोन पर्याय आहे, एक त्याने इंजिनियर बनायचं आणि दुसरा पर्याय आहे त्याने मुझिशियन (संगीत तज्ञ) बनायचे. तो मुलगा इंजिनियर बनतो. पण "समांतर ब्रम्हांड " ही संकल्पना हे सांगते की तो मुलगा "दुसऱ्या ब्रम्हांडात" असलेला ग्रहावर "मुझिसियन" बनू शकतो.. विश्वास ठेवावा असे वाटत नाही पण ही संकल्पना अशी आहे.. अगदी टाकाऊ आणि फेक अशी संकल्पना पण नाही आहे. मोठ मोठे शास्त्रज्ञ यावर विचार करत होते.. 1954 मध्ये एव्हरेट (Hugh Everett III) या शास्त्रज्ञ ने प्रथम "समांतर ब्रम्हांड ' ही संकल्पना मांडली होती.स्वतः स्टीफन हौकिंग हे देखील समांतर किंवा अनेक ब्रम्हांड वर आपले विचार त्यांच्या शेवटच्या रिसर्च पेपर मध्ये मांडले होते . स्टीफन हॉकिंग चे दृष्टीने ब्रम्हांड "एकच " असू शकत नाही आणि आपण या सृष्टीत विशेष (युनिक) नाही आहोत.
"डेजा वू" आणि "टाइम ट्रॅव्हल पराडॉक्स" या दोन प्रश्नांना देखील "समांतर ब्रम्हांड" ही संकल्पना उत्तर देऊ शकते..पण लेख प्रपंच मोठं होईल. पुन्हा कोणत्यातरी लेखात या वैज्ञानिक संकल्पना किंवा गूढ रहस्य मांडेन.
डॉ. अलोक कदम.
Comments
Post a Comment