आपल्या "सौर माला"(solar system) च्या बाहेर काय आहे ??
आपल्याला असे वाटत असेल की, सौर मालेच्या बाहेर शेजारील तारे असतील.. उत्तर बरोबर आहे.. पण आपला सूर्य आणि शेजारील तारा च्या मधल्या भागात काय आहे ? तुम्हाला वाटत आहे का की ,दोन ताऱ्या मध्ये रिकामी जागा असेल ?? जर तुमचं उत्तर "होय" असेल......तर तुम्ही चुकीचे आहात. दोन तारा मधील भाग हा रिकामी नसतो, त्यात जे काही आहे त्याला इंटरस्टेलर मिडीयम ( Interstellar medium) म्हणतात. यात धूळ, कॉस्मिक किरणे,रेडिएशन, गॅस इत्यादी घटक असतात.. हा खूप विशाल भाग असतो. आपल्या सूर्य आणि इतर ताऱ्यांच्या मधल्या भागात देखील इंटरस्टेलर मिडीयम आहे. मानवाने अजून हा भाग आपल्या कृत्रिम यानाने देखील पार केला नाही, इतका तो दूर आणि विशाल आहे..
आपल्या सूर्याच्या जवळचा तारा "प्रॉक्सीमा सेंटुरी " आणि सोबतचे दोन तारे हे सुमारे 4.3 प्रकाशवर्ष दूर आहे.. बर्नार्ड स्टार हा एक लहान तारा असून सुमारे 6 प्रकाशवर्ष दूर आहे. "सीरियस A " हा तारा आपल्याल आकाशात सर्वात चमकणारा तारा दिसतो. सूर्यापेक्षा मोठा असलेला हा तारा आपल्या पृथ्वीपासून 8.6 प्रकाशवर्ष दूर आहे. अजून अनेक तारे आहे, जर 10 प्रकाशवर्ष चे आपल्या सौरमालेभोवती वर्तुळ काढले तर त्यात ते येतील.. मात्र यातील " प्रॉक्सीमा सेंटुरी " हा सर्वात जवळचा म्हणजे 4.3 प्रकाशवर्ष दूर तारापर्यंत आपण पोहवणे देखील कठीण आहे. जिथे प्रकाशाला त्याच्या ३ लाख किमी प्रती सेकंद या वेगाने पोचण्यास 4 वर्ष लागतात, तिथे मनुष्याने बुलेट (बंदुकीची गोळी) वेगाने जरी जाण्याचे ठरवले तरी कित्येक हजारो वर्ष लागतील.
सौर मालेच्या भोवतालचा प्रदेश हा कित्येक लाख किलोमीटर मोठा आहे. आकाशातील अंतर हे astronomical unit AU मध्ये मोजले जाते. पृथ्वी आणि सूर्य मधील अंतर हे सुमारे 15 करोड किमी आहे, याला 1 AU म्हणतात.
आपला शनी ग्रह असे 10 AU इतका दूर आहे. नेपच्यून चे पलीकडे असलेला "कायपर बेल्ट" हा 100 AU आहे. आणि प्लुटो च्या पलीकडे असलेला विशाल "उर्त क्लाउड" oort cloud हे अंदाजे 100 ते 100000 (1 लाख) AU इतके पसरले आहे..1 लाख AU "गुणिले" (multiply) पृथ्वीसूर्यमधील अंतर 15 करोड किमी करा. सुर्याचा चुंबकीय तरांगाचा प्रभाव यापूर्वी म्हणजे 123 AU पर्यंत संपतो. पुढे फक्त इंटरस्टेलर मिडीयम मधील "उर्ट क्लाउड" असते.
प्रकाशवर्ष मध्ये मोजले तर हे अंतर 2 प्रकाशवर्ष दूर आहे. "प्रॉक्सीमा सेंटुरी " जर 4 .3 प्रकाशवर्ष दूर आहे तर उर्ट क्लाउड च्या पुढे या ताऱ्याच्या प्रभाव सुरू होतो.
"अस्टरोईड बेल्ट " "कायपर बेल्ट" आणि "उर्त क्लाउड" याबद्दल थोडक्यात माहिती मी पुढील लेखात लिहेन. सौरमाला चा बाहेर आपण मानवाने जे "यान" सोडले आहेत, ते सध्या कुठे आहेत हे पण मी थोडक्यात लिहेन..पण आपल्याला अंदाज आला असेल की , आपल्या सौरमाले समोरच आपण किती सूक्ष्म आहोत.!!!
डॉ. अलोक कदम
Comments
Post a Comment