"वार्म अप" हा व्यायामाचा अतिशय आवश्यक भाग आहे..
आपल्यापैकी बरेच जण शरीर सुदृढ व निरोगी राहण्यासाठी जिम मध्ये व्यायाम करतात तसेच मैदानी खेळ ,नृत्य , पोहणे, मार्शल आर्ट व इतर अथलेटिक खेळ च्या माध्यमातून व्यायाम करतात. परंतु कोणताही व्यायाम करण्या अगोदर "वार्म अप" करणे का आवश्यक आहे हे आपण या लेखात पाहणार आहोत.
"वार्म अप " ही व्यायाम करण्यापूर्वीची पूर्वतयारी आहे . 'वार्म अप" हे आपल्याला शारीरिक व्यायामाचा वेळी जी इजा व दुखणे होते त्याची तीव्रता कमी
करण्यास मदत करते . शरीरातील पेशी व मांसाला हळू हळू ऑक्सिजन युक्त रक्तप्रवाह मिळण्यास व शरीराचे तापमान वाढण्यास "वार्म अप" मुळे शक्य होते जेणेकरून एकाएकी हदय ,फुफुप्स व रक्तवाहिन्यांवर दबाव येऊ नये. "वार्म अप" मुळे सांधे व मांस हे थोडे मोकळे होतात ज्यामुळे लवचिकतेचे व्यायाम करण्यास मदत मिळते. तसेच आपले शरीर व मन पुढील व्यायाम करण्यास "वार्म अप" मुळे तयार होत असते."वार्म अप" शिवाय जर आपण व्यायाम केला तर या अचानक शरीराच्या एखादया भागात चमक भरु शकते कारण "वार्म अप" शिवाय केलेल्या व्यायामात हाडे,मांस व सांधे हे एकाएकी एखादा झटका किंवा शॉक सहन करू शकत नाही .तुम्ही जिम मध्ये शरीरसौष्ठव साठी व्यायाम करत असाल तर अवजड वजन उचलण्यापूर्वी "वार्म अप" करणेआवश्यक आहे. तुम्ही एखादा मैदानी खेळ खेळणार असाल तरी "वार्म अप" आवश्यक आहे.
तुम्ही मार्शल आर्ट (निशस्त्र व शस्त्रकला) चा सराव करणार असाल तर यात तर शारीरिक कष्ट मोठया प्रमाणावर होत असत. कराटे ,कुंग फु, मुई थाई सारखे जे मार्शल आर्ट त्यात हात ,पाय ,कोपर,गुडघा यांची अतिशय जलद गतीने व विविध दिशेने हालचाली करायची असतात तसेच एकमेकांशी युद्ध चा सराव करताना शारीरिक इजा होण्याची शक्यता असते ,अशावेळी प्रारंभी "वार्म अप " करणे फायदेशीर ठरते. अथलेटिक खेळ ज्यात उंच उड्या मारणे ,कसरती करणे ,मल्लखांब तसेच पोहणे , नृत्य करणे यात देखील शरीराला लवचिक राहावे लागते. वरील सर्व प्रकार व इतरही शारीरिक क्रिया करण्यापूर्वी "वार्म अप" करणे अत्यावश्यक आहे.
जे व्यायाम मांसाच्या शक्तीसाठी केले जातात उदा.वजन उचलणे ,
ज्या व्यायामात मोठया प्रमाणावर ऑक्सिजन वापरलं जाते व रक्तप्रवाह जलद होते उदा. धावणे, दोरी वरील उड्या,
ज्या व्यायामात शरीरातील कर्बोदके व अतिरिक्त चरबी वापरले जातात उदा.पुश अप ,
तसेच ज्या व्यायामात शरीरावर ताण येतो उदा. स्ट्रेचिंग, पूल उप ,अशा व्यायामाचा अगोदर वॉर्म अप करावा.
तुम्ही करत असलेल्या व्यायामावर देखील त्याचा विशेष "वार्म अप" अवलंबून असतो. जस तुम्ही सकाळी काही किलोमिटर धावणार असाल तर सुरवातीला थोडे चालणे व हळू धावणे हा त्याचा "वार्म अप" झाला. जिम मध्ये अवजड वजन उचलन्या अगोदर तुम्ही त्याहून हलके वजन उचलून सुरवात करणे हा एक प्रकारे 'वार्म अप' आहे. थोडक्यात "वार्म अप" हा कमी ताण देणारा,कमी कष्ट लागणारा, सहज करण्यासारखं, कमी गती मध्ये करावा लागणारा व्यायाम चा प्रकार आहे. सुरुवातीला कमी कष्ट व नंतर हळू हळू अधिक कष्टाचे व्यायाम असा चढता क्रम म्हणजे "वार्म अप ते व्यायाम" असं म्हणता येईल.
"वार्म अप" किती वेळ करावा ?
-साधारण ५ ते १० मिनिटं वॉर्म अप करावा. थंड वातावरणात थोडा अधिक "वॉर्म अप" करावा. जास्त कष्टाचा व्यायाम साठी जास्त वेळ "वार्म अप" करावा .
कोणता "वार्म अप" करावा?
-तुम्ही कोणता व्यायाम करता यावर तुमचा "वार्म अप" अवलंबून आहे. तुमच्या ट्रेनर चा सल्ला व मार्गदर्शन घ्यावं.
"वार्म अप " चे महत्वाचे फायदे -
- शरीर व मन व्यायाम साठी तयार होते.
- व्यायाम करताना होणारी इजा व दुखणे कमी करण्यास मदत
- रक्तप्रवाह हळू हळू वाढण्यास मदत होते जेणेकरून मांसपेशींना पुढील व्यायामासाठी आवश्यक ऑक्सिजन मिळावा
- श्वासोश्वासची गती हळू हळू नियंत्रणात येते. व्यायाम करताना अचानक दम लागणे हे टाळण्यासाठी 'वार्म अप' उपयुक्त.
- अचानक चमक भरणे हा प्रकार वर नियंत्रण करता येतो
- शरीरातील मांस व सांधे लवचिक करण्याचे व्यायाम करण्यास तयार होते
- व्यायाम करताना अचानक रक्तदाब (blood pressure) वाढण्याचा प्रकार नियंत्रित करता येतो
- व्यायाम करताना आवश्यक असलेलं मेंदू ,मज्जातंतू व मांस यांचं एकत्रित नियंत्रण याला "वार्म अप" मुळे मदत मिळते.
-
डॉ. अलोक कदम
Comments
Post a Comment