Hello Friends, My mission is to educate the people. This is One of The Platform, where you can get the information of Various Fields in Marathi (one of the indian language). I am doing Research, Studying and Writing the various scientific and Authentic Information. The Students or Individual from anywhere ,can easily understand the " Basic Concepts " in their Mother tongue. These blog's have emphasis on Development of " scientific Temper " or " an attitude of reasoning and questioning " on different things in the people of India. Thank you
तुम्ही सिगारेट ओढत असाल, तर हे जरूर वाचा ..…
सिगारेट हे हानिकारक आहे , हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. सिगारेटच्या पाकीटवर देखील ते, शरीराला हानिकारक आहे ,असे लिहिलेले असते. तरीही लोक सिगारेट ओढतात ,कारण त्यांना सिगारेट ओढण्याचे व्यसन (addiction) लागलेले असते. जागतिक आरोग्य संघटना (WHO) कडील माहिती नुसार जगात सुमारे 8 दशलक्ष (8 million) लोकांचा तंबाखूमुळे मृत्यू होतो. सिगारेट हे तंबाखूपासून बनलेले असते.
काही लोक स्टाईल म्हणून सिगारेट ओढत असतात. सिनेमा मध्ये सिगारेट ओढणे म्हणजे काहीतरी "डेशिंग" आहे, असे चित्र उभे केले जाते. सिगारेट म्हणजे "भाईगिरी" चे प्रतीक आहे. सिनेमामध्ये हिरो हा एक सिगारेट ओढतो, हवेत धूर सोडतो, मग ती अर्धी सिगारेट ही बुटाखाली चिरडतो आणि चार गुंडांना मारतो. मग हिरोचा हा पराक्रम पाहून त्याला हिरॉईन देखील पटते. मग, छपरी मुले आणि मुली या दृश्याने प्रभावित होऊन प्रत्यक्ष जीवनात या "फिल्मी स्टाईलची" कॉपी करतात. हे आजकाल समाजाचे वास्तव छपरी चित्र आहे. सिगारेट ओढून तरुणांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो हे या थिल्लर तरुणांना समजत नाही. काही लोक सिगारेट नशा म्हणून ओढतात. सुशिक्षीत लोक देखील एखादे बौद्धिक काम रात्रंदिवस जागून करायचे असेल, तर ते सिगारेट ओढतात कारण त्यामुळे त्यांना उत्तेजना मिळते आणि एकाग्रता साधता येते. अशा कोणत्याही कारणास्तव माणूस जर सिगारेट ओढत असेल तर, त्याच्या शरीराची कशी हानी होते आणि सिगारेट चे व्यसन कसे जडते, हे आपण या लेखात समजून घेणार आहोत.
सिगारेट हे तंबाखूला एका कागदात गुंडाळून त्यापासून बनवलेली एक छोटी दांडी असते. ज्याला एका बाजूने जाळले असता , त्यातून जो धूर निघतो तो धूर मनुष्य ओढतो. सिगारेट ओढल्याने माणसांना तात्पुरती उत्तेजना मिळते आणि ताजतवाने वाटते. सिगारेट मधील तंबाखू मध्ये शरीरास अपायकारक घटक असतात. तंबाखू चे सिगारेट रुपात किंवा इतर कोणत्याही रुपात सेवन करणे , हे हानिकारकच आहे. पण या लेखात आपण सिगारेट विषयक माहिती पाहणार आहोत. तंबाखू ही एक वनस्पती आहे ,जी अनेक देशात आढळते. भारतात देखील तंबाखू चे उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर होते. तंबाखूची सुकलेली पाने ही बारीक करून बाजारात विकली जातात. त्यापासून सिगारेट, सिगार, बिडी असे वस्तू बनवले जातात. तंबाखू मध्ये "निकोटिन " नावाचा उत्तेजना देणारा मुख्य घटक असतो. त्यासोबतच सिगारेट मध्ये कार्बन मोनॉक्साईड, हायड्रोजन सायनाईड, कारसिनोजेन (कॅन्सर निर्माण करणारे घटक ), आर्सेनिक, निकेल, कॅडमियम इत्यादी रासायनिक घटक असतात. जे यकृत, हदय , फुफुप्स (lung) , मेंदू या आपल्या महत्त्वाच्या अवयव ला हानिकारक असतात.तसेच ,सिगारेट मधील तंबाखू जळल्यावर जो तंबाखूचे राख शिल्लक राहते त्याला "तार" म्हणतात. हा "तार" सर्वात भयानक विषारी पदार्थ असतो. यामुळे व्यक्तीला कॅन्सर होऊ शकतो. सिगरेट बनवणारी कंपनी दावा करते की आम्ही फिल्टर लावतो. तरीही "तार" आपल्या फुफुप्स मध्ये जातेच.
आता शरीराची हानी कशी होते हे आपण समजून घेण्यापूर्वी आपण आपले फुफुप्स (lung) हे ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साइड या वायूला कसे नियंत्रित करते ते पाहूया. त्यानंतर सिगारेट ओढल्यावर आपली कशी हानी होते, हे तुम्हाला चटकन कळेल.
आपले फुफुप्स हे वातावरणातील "ऑक्सिजन" श्र्वासावाटे घेते आणि बाहेर "कार्बन डायऑक्साईड" सोडते. छातीमध्ये दोन्ही बाजूला फुफुप्स स्थित असतात. आपल्या श्र्वासनलिका तून हवा येऊन दोन्ही फुफुप्स मध्ये जाते. श्वसनसंस्थेतील नलिकेचे श्वासनलिका (Trachea) , ब्रोंकस (bronchus) ब्रोक्योलस (Bronchioles) आणि अल्वेओलाई (Alveoli) असे चार भाग असतात. आपण जो श्वास घेतो तो श्वास या चार भागातून फुफुप्स पर्यंत पोहचतो. फुफुप्स मध्ये अल्वेओलाई (Alveoli) हा खूप महत्वाचा भाग आहे. इथे हवेतील "ऑक्सिजन" आणि "रक्तवाहिनी" मधील "कार्बन डायऑक्साइड" यांची देवाण घेवाण होते. रक्तात "हिमोग्लोबिन" नावाचे एक प्रथिन असते . ऑक्सिजन चे अणू हे हिमोग्लोबिन सोबत जोडले जातात व ते संपूर्ण शरीरातील पेशींना ऑक्सिजन पुरवतात. ब्राँकस मध्ये "सीलिया" असतात आणि मुकस (mucus) हा चिकट द्रव तयार होत असतो जो आपल्या शरीरात नाकाद्वारे हवे बरोबर येणाऱ्या विषारी घटक, जिवाणू , विषाणू यांच्या पासून संरक्षण करण्याचं काम करत असतात.
तुम्ही जर रोज सिगारेट ओढत असाल तर त्यातील घातक वायू विशेषतः कार्बन मोनॉक्साइड हे या रक्तातील हिमोग्लोबिन सोबत जोडले जाते. शरीरात ऑक्सिजन ची कमतरता निर्माण होते. कार्बन मॉनॉक्साईड सोबत "निकोटिन" व इतर विषारी घटक देखील याचमार्गे तुमच्या रक्तात मिसळतात. संपूर्ण शरीरात प्रवेश करतात. निकोटिन हे नशा निर्माण करणारे पदार्थ आहे. ते जेव्हा मेंदूत आणि मज्जातंतू मध्ये पोहचते ,तेव्हा तेथील पेशींवर असलेल्या "निकोटिन असिटलकोलाईन रीसेप्टर " शी जोडून "डोपामाइन", "अड्रेनालिन" व "सेरोटिनिन" या "न्यूरोट्रान्समीटर" ला कार्यरत करते, त्यामुळे तुम्हाला ताजेतवाने, उर्जावान आणि आनंदी वाटते. मनावरील ताण कमी होतो, एकाग्रता वाढते.आणि हा आनंद पुन्हा भेटावा, म्हणून माणूस पुन्हा सिगारेट ओढतो.अशा प्रकारे त्याला व्यसन जडते.
जेव्हा तुम्ही सिगारेट ओढता तेव्हा "तार" आणि "हायड्रोजन सायनाईड " हे तुमच्या ब्रोंकस ला इजा करतात. त्यामुळे जे "मुकस आणि सिलिया " हे जे विषारी पदार्थ , विषाणू, जिवाणू ला बाहेर टाकण्यास मदत करत असतात, त्यांनाच इजा झाल्यामुळे हे विषारी पदार्थ,जिवाणू विषाणू हे ब्रोंकसमध्ये साठून राहतात. त्यामुळे रुग्णाला सतत खोकला येतो. एकूणच "क्रोनिक ओबस्ट्रक्टिव पलमोनरी डिसिज (COPD)" या आजाराचा त्रास सुरू होतो. या आजारावर कायमचा उपचार नाही. सिगारेट आणि तंबाखू शरीरात कॅन्सर होऊ शकतो. सोबत ,रक्तात गाठी होण्याचे प्रमाण वाढते त्यामुळे व्यक्तीस "हदय विकार" आणि "ब्रेनस्ट्रोक" (मेंदू व संबंधित आजार) चा त्रास होऊ शकतो. तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते.
सिगारेट ओढत असाल किंवा तंबाखू चे इतर घटक चे सेवन करत असाल, तर वेळीच सावधान व्हा..
- डॉ अलोक कदम
Comments
Post a Comment