Skip to main content

Posts

INTRODUCTION

  Hello Friends, My mission is to educate the people. This is One of The Platform, where you can get the information of Various Fields in Marathi (one of the indian language).   I am doing Research, Studying and Writing the various scientific and Authentic Information. The Students  or Individual from anywhere ,can easily understand the " Basic Concepts  " in their Mother tongue. These blog's have emphasis on Development of " scientific Temper " or " an attitude of reasoning and questioning "  on different things in the people of India. Thank you

कॅश मार्केट आणि डेरीव्हेटिव मार्केट

 कॅश मार्केट आणि डेरीव्हेटिव मार्केट "स्टॉक मार्केट" मध्ये हे दोन प्रमुख प्रकार असतात..आज आपण त्याबद्दल थोडक्यात समजून घेऊ. पण एक गोष्ट लक्षात घेतले पाहिजे, की हे खूप बेसिक ज्ञान आहे.. स्टॉक मार्केटचे सखोल अभ्यास आणि त्यात एक्स्पर्ट असल्याशिवाय मार्केट मध्ये कोणीही कोणतीही गुंतवणूक करू नये. "शेअर मार्केट" मध्ये लोक हे कंपनीचे "शेअर" खरेदी करतात.. ते शेअर खरेदी करण्यासाठी लागणारी गुंतवणूक ही कंपनीला मिळणारे "भांडवल" असते. मागील लेखात, ipo संदर्भातील मी सांगितले की कशाप्रकारे एक कंपनी ही शेअर मार्केट मध्ये "लिस्ट" होते.. कंपनीच्या शेअरचे जे "भाव" असतात, ते भाव खरेदीदार (buyer) आणि विक्रेता (seller) यामध्ये कमी जास्त होत असतात..खरेदी करणारे लोक हे शेअर चे भाव वाढवतात आणि विक्री करणारे लोक हे शेअर चे भाव कमी करतात.. मागणी आणि पुरवठा या अर्थशास्त्रच्या सिद्धांतवर मार्केट काम करत असते.  कॅश मार्केट -  जे नॉर्मल शेअर मार्केट असते, जिथे एखाद्या कंपनीचे शेअरचा भाव चालू आहे , आपण त्या चालू किमतीला पूर्ण रक्कम भरून "शेअर "खरेदी...

सूपरनोवा - एक महाकाय खगोलीय घटना

  सूपरनोवा - एक महाकाय खगोलीय घटना मित्रहो, आज आपण "सुपरनोवा" या एक महाकाय खगोलीय घटना विषयी थोडक्यात माहिती जाणून घेऊया..आपण जेव्हा अवकाशाचा अभ्यास करतो, तेव्हा अशा बऱ्याच गोष्टी असतात की, जे आपले भुवया उंचावतात..अशीच एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे "सूपरनोवा". "सुपरनोवा" हा एक प्रचंड मोठा व चमकदार असा "विस्फोट" असतो..जेव्हा एखादा विशाल तारा (सूर्यापेक्षा मोठा) त्याच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणी मरणासन्न अवस्थेत पोहचतो किंवा एखादा "व्हाइट द्वार्फ" तारा हा जवळच्या ताऱ्याला आपल्याकडे खेचतो, तेव्हा प्रचंड ऊर्जा एका छोट्याशा भागात एकवटून आकाशात प्रचंड मोठा "स्फोट" घडतो.  हा इतका मोठा स्फोट असतो, की आपल्या सुर्यांने त्याच्या संपूर्ण आयुष्यात एवढी ऊर्जा उत्सर्जित केली नसेल, एवढी प्रचंड ऊर्जा त्या स्फोटातून बाहेर निघते. या स्फोटातून प्रचंड लक्ख प्रकाश बाहेर पडतो, की संपूर्ण दीर्घिका (Galaxy) मध्ये  जितका प्रकाश असेल तितका किंवा त्यापेक्षा जास्त प्रकाश हा त्याचा असतो..या स्फोटात प्रचंड मोठे "शॉकवेव" आणि "रेडिए...

शनी ग्रहचे गुरुत्वाकर्षण हे आपल्या पृथ्वीच्या तुलनेने अगदी थोडेच जास्त आहे !! असे का ??

  शनी ग्रहचे गुरुत्वाकर्षण हे आपल्या पृथ्वीच्या तुलनेने अगदी थोडेच जास्त आहे !! असे का ??  शनी हा ग्रह आपल्या आपल्या सूर्यमालेतील आकाराने दुसरा मोठा ग्रह आहे, हे आपण सर्व जाणतो. सूर्यमालेतील 8 ग्रह पैकी (9 वा प्लुटो हा dwarf planet आहे) गुरु, शनी, युरेनस आणि नेपच्यून हे प्रचंड मोठे ग्रह आहे. त्यातील गुरू हा सर्वात मोठा ग्रह आहे.. शुक्र हा साधारण आपल्या पृथ्वी एवढाच ग्रह आहे. मंगळ आणि बुध हे पृथ्वीपेक्षा लहान ग्रह आहेत. बुध हा सर्वात लहान ग्रह आहे.. आता, यात शनी हा गुरू नंतर इतर सर्व ग्रहापेक्षा मोठा ग्रह आहे. शनी हा पृथ्वीपेक्षा 9 पटीने रुंद आहे. शनी हा ग्रह पृथ्वीपेक्षा इतका मोठा आहे, की शनीमध्ये 700 पेक्षा जास्त पृथ्वी राहू शकतात..म्हणजे तुम्ही कल्पना करा !!!  असा हा प्रचंड मोठा शनी ग्रहचे वस्तुमान आणि आकारमान इतके जास्त असताना , त्याचे गुरुत्वाकर्षण (surface Gravity)वास्तविक पृथ्वीच्या तुलनेने प्रचंड जास्त असले पाहिजे.. पण वास्तविक तसे नाही..!!! शनीचे गुरुत्वाकर्षण पृथ्वीपेक्षा अगदी थोडेच जास्त आहे .पृथ्वीच्या तुलनेने फक्त 1.07 पटीने जास्त आहे.. कोणत्याही ग्रहाचे गुरुत...

पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण आपल्याला जाणवत का नाही..???

  पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण आपल्यावर लागू असते, मग ते गुरुत्वाकर्षण आपल्याला जाणवत का नाही..??? हा प्रश्न मला लहानपणी पडायचा आणि आपल्या पैकी बऱ्याच जणांना हा प्रश्न पडला असेल की , आपण ज्या पृथ्वीवर राहतो, त्या पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल  हे आपल्याला सतत खेचत असते, मग तसे आपल्याला सतत जाणवत का नाही..? गुरुत्वाकर्षण बल हे दोन वस्तूंचे "वस्तुमान" आणि त्यांच्यातील "अंतर" या दोन गोष्टीवर अवलंबून असते. पृथ्वीच्या तुलनेने आपण खूप लहान आहोत आणि आपले वस्तुमान पण खूप कमी आहे... आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावर आहोत. तसेच, पृथ्वीच्या जवळील वातावरणात जरी असलो, तरी पृथ्वीच्या केंद्रातून आपल्यावर सतत गुरुत्वाकर्षण शक्ती द्वारे पृथ्वीकडे खेचले जाते...  पृथ्वीचे गुरुत्वाकर्षण बल हे आपल्यावर स्थिर (constant) प्रकारे सतत लागू असते.आपला जन्म पण पृथ्वीच्या वातावरणात झाला आहे. आपण जे काही दैनदिन आयुष्यात करतो, त्यात गुरुत्वाकर्षण आपल्या सोबत सतत असते,कारण आपण पृथ्वीच्या पृष्ठभागावर आणि वातावरणात असतो.. गंमत म्हणून सांगायचं झालं तर, "तुम्हाला तुमची गर्लफ्रेंड जरी सोडून गेली किंवा बायकोने जरी ...

मनुष्य शाकाहारी आहे की मांसाहारी आहे ??

  मनुष्य शाकाहारी आहे की मांसाहारी आहे ?? अनेकांना हा प्रश्न पडला असेल, की माणूस हा शाकाहारी आहे की मांसाहारी आहे ? मनुष्य हा एक बहुपेशीय सजीव आहे, तसेच इतर प्राणी आणि वनस्पती हे देखील बहुपेशीय सजीव आहेत..आपल्या शरीरात अब्जावधी पेशी जगत असतात, ते पेशी सुध्दा सजीव असतात. त्यांना कर्बोदके, स्निग्ध पदार्थ, प्रथिने, व्हिटॅमिन, क्षार आणि पाणी हे जगण्यासाठी लागत असते..या अन्नपदार्थ मधून ऊर्जा उत्पन्न होत असते. अन्न आणि स्वसंरक्षणसाठी एक सजीव हा दुसऱ्या सजीवाला मारत असतो, ही एक अन्नसाखळी असते. करोडो वर्ष पृथ्वीवर डायनासोरचे राज्य होते, ते सुद्धा दुसऱ्या जीवांना मारत होते. पृथ्वीवर अजून डायनासोर असते, तर मनुष्य तर सोडाच अनेक सस्तन प्राणी (Mammals) यांचे जगणे देखील मुश्किल झाले असते.. डार्विनच्या सिद्धांत नुसार, प्रत्येक जीव हा स्वतःच्या अस्तित्वासाठी झगडत आला आहे.. संघर्ष हा निसर्गातील प्रतिकूल परिस्थितीशी असो किंवा एकमेकांशी असो.. प्रत्येक जीवाने संघर्ष करून इथपर्यंत प्रवास केला आहे. निसर्गातील प्रतिकूल परिस्थितीमध्ये सजीव हा जगण्यासाठी जे काही मिळेल त्यावर जगत आला आहे. तसेच,वनस्पती हे पण...

जीवनसत्व (विटामिन)

जीवनसत्व   जीवनसत्वे (व्हिटॅमिन) ही आपल्या शरीरात अत्यंत महत्वाची भूमिका बजावत असतात. आज या लेखात आपण फक्त "जीवनसत्व" विषयी माहिती पाहणार आहोत. जीवनसत्वे (व्हिटॅमिन) हा काय प्रकार असतो ?  आरोग्याच्या दृष्टीने ते का महत्वाचे आहेत हे आपण यात पाहणार आहोत.  जीवनसत्व हे नावाप्रमाणे जीवनातील अत्यंत महत्वाचे पोषक तत्व आहे. जीवनसत्व ची कमतरता असेल तर बऱ्याच आजारांना निमंत्रण असते. जीवनसत्वे ही आपल्या  वाढीसाठी, प्रजनन साठी, शरीरातील जीवरासायनिक क्रियासाठी आवश्यक असते.  जीवनसत्वे ही   " मायक्रोन्यूट्रीअन्ट्स" (micronutrients) या विभागातील अन्नघटक आहेत.. प्रथिने ,कर्बोदके, स्निग्ध पदार्थ हे  मॅक्रोन्यूट्रीअन्ट्स (macronutrients) या विभागात येतात. प्रथिने ही शरीराच्या वाढीसाठी आणि ऊर्जा मिळवण्यासाठी आवश्यक असतात, हे आपल्याला माहीत आहे. प्रथिने ,स्निग्ध पदार्थ, कर्बोदके यांच्यापासून ऊर्जा निर्माण होण्यासाठी विशेष प्रकारचे "जीवरासायनिक क्रिया " असतात. त्यात, पाणी आणि क्षार आवश्यक असते, सोबत "जीवनसत्व" देखील आवश्यक असते.. जीवनसत्व हे यांना जीवरासायनिक क्रिय...

तुम्ही सिगारेट ओढत असाल, तर हे जरूर वाचा

  तुम्ही सिगारेट ओढत असाल, तर हे जरूर वाचा ..… सिगारेट हे हानिकारक आहे , हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. सिगारेटच्या पाकीटवर देखील ते, शरीराला हानिकारक आहे ,असे लिहिलेले असते. तरीही लोक सिगारेट ओढतात ,कारण त्यांना सिगारेट ओढण्याचे व्यसन (addiction) लागलेले असते. जागतिक आरोग्य संघटना (WHO) कडील माहिती नुसार जगात सुमारे 8 दशलक्ष (8 million) लोकांचा तंबाखूमुळे मृत्यू होतो. सिगारेट हे तंबाखूपासून बनलेले असते. काही लोक स्टाईल म्हणून सिगारेट ओढत असतात. सिनेमा मध्ये सिगारेट ओढणे म्हणजे काहीतरी "डेशिंग" आहे, असे चित्र उभे केले जाते. सिगारेट म्हणजे "भाईगिरी" चे प्रतीक आहे. सिनेमामध्ये हिरो हा एक सिगारेट ओढतो,  हवेत धूर सोडतो, मग ती अर्धी सिगारेट ही बुटाखाली चिरडतो आणि चार गुंडांना मारतो. मग हिरोचा हा पराक्रम पाहून त्याला हिरॉईन देखील पटते. मग, छपरी मुले आणि मुली या दृश्याने प्रभावित होऊन प्रत्यक्ष जीवनात या "फिल्मी स्टाईलची" कॉपी करतात. हे आजकाल समाजाचे वास्तव छपरी चित्र आहे. सिगारेट ओढून तरुणांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो हे या थिल्लर तरुणांना समजत नाही. काही...

पाठांतर पेक्षा विषय समजून घेवून अवांतर वाचन करावे

पाठांतर पेक्षा विषय समजून घेवून अवांतर वाचन करावे.. आपल्याकडे शिक्षणपद्धती ही "पाठांतर" वर आधारित आहे. ज्याला सामान्य ज्ञान मधील एखादया प्रश्न चे उत्तर देता येत नाही म्हणून त्याला ट्रोल करू नका.. ट्रोल करायचे असेल ,तर शिक्षणपद्धतीला करा. कारण आपण शाळेतून काय प्रकारचं शिक्षण घेतो, यावर सर्व अवलंबून असते . काही पाठांतरवादी शिक्षकांनी मुलांना पाठांतर करण्याची प्रचंड सवय लावल्यामुळे आपल्या शिक्षणाचा दर्जा खूप घसरला आहे.. पाठांतर हे काही विषयात आवश्यक असते, मात्र इतर विषय हे तुम्हाला समजूनच घ्यावे लागतात. गणित व विज्ञान तुम्ही पाठ  करू शकत नाही. पाठांतरला पण काहीतरी लॉजिक लागते.. रोज एखादी गोष्ट नजरे समोर गेली आणि इतिहास मध्ये क्रम (sequence) लक्षात घेतला की , सर्व गोष्टी लक्षात राहतात.. पानिपत चे पहिले युद्ध "बाबर आणि इब्राहिम लोदी" मध्ये झालेलं, पानिपत दुसरे युद्ध "खेमु आणि अकबर " मध्ये आणि तिसरे पानिपत युद्ध "मराठा आणि अहमदशाह अब्दाली, यांच्यात झालेलं,  अशा इतिहासाला गोष्टी आणि क्रम स्वरूपात समजून घेतले की सर्व लक्षात राहते.. तुम्ही व मी आपण सर्वांनी ह...

हबीटेबल झोन - ग्रहाची विशिष्ठ कक्षा

  हबीटेबल झोन (habitable zone) - ग्रहाची विशिष्ठ कक्षा आपली पृथ्वी ही सौर मालेतील विशिष्ट ग्रह आहे. पृथ्वीवर जीवसृष्टी का आहे ? सौर मालेतील इतर ग्रहवर जीवसृष्टी का नाही ? याच उत्तर आहे , पृथ्वीची सूर्याभोवती ची विशिष्ट कक्षा, ज्याला 'हबीटेबल झोन (habitable zone)" असे म्हणतात. शुक्र हा ग्रह साधारण आपल्या पृथ्वी एवढं आकारमान ने आहे.मात्र सूर्य पासून जवळच्या अंतरावर तो भ्रमण करत असल्याने  ती "हबीटेबल झोन" मध्ये नाही. शुक्र हा सर्वात तप्त ग्रह आहे, आपण तिथे एक मिनिट देखील जिवंत राहू शकत नाही.. मंगळ ग्रह देखील ग्रह "हबीटेबल झोन" मध्ये नाही.  मात्र थोडेसे बदल करून मंगळावर आपण राहू शकतो.. एलोन मस्क आणि नासा यासाठी युद्ध पातळीवर काम करत आहेत, मात्र मंगळ वर आपली तात्पुरता सोय होऊ शकते. पण सूर्य सोडून इतर ताऱ्या भोवती फिरणाऱ्या ग्रह मध्ये आपल्याला हबीटेबल झोन" मधील ग्रह (exoplanet) शोधावा लागेल. आपली पृथ्वी ही आपल्यास फार काळ राहण्यास उपयुक्त ठरणार नाही.. मानव सृष्टी ही जिवंत ठेवायची असेल तर आता पासून आपल्याला पृथ्वी सारखा ग्रह शोधावा लागेल.. पृथ्वी वर जीवन आहे ...

मिलिंद प्रश्न

  मिलिंद प्रश्न  "मिलिंद प्रश्न " भारतीय साहित्यमधील  प्रसिद्ध पुस्तक आहे. जसे भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन या गुरू-शिष्य यांच्या संवाद वर "भगवतगीता " हा ग्रंथ हा आधारित आहे. जसे अष्टावक्र आणि राजा जनक या गुरु शिष्य वर आधारित "अष्टावक्रगीता" हा ग्रंथ आहे..तसा बौद्ध भिखु नागसेन आणि राजा मिनांडर (मिलिंद) या गुरू-शिष्य  यांच्यातील संवाद वर आधारित "मिलिंद प्रश्न" हा प्रसिद्ध ग्रंथ आहे.. राजा मिनांडर (मिलिंद) हा "बॅक्ट्रिया" चा इंडो-ग्रीक शासक होता. इसवी सन पूर्व 206 ते इसवी सन पूर्व 140 चे दरम्यान बॅक्ट्रीया म्हणजे आताचे ताजकिस्थान अफगाणिस्तान या प्रदेशवर राज्य करत होता. मिनांडर हा मूळचा ग्रीस देशाचा असून त्याचे साम्राज्य हे आताच्या अफगाणिस्तान पासून पाकिस्तान व पंजाब पर्यंत पसरले होते.मिनांडर हा खूप पराक्रमी राजा होताच ,त्या बरोबरच तो खूप हुशार ,वाद विवादात निपुण, तत्वज्ञानी आणि तार्किक होता.  त्याचा ग्रीक आणि भारतीय शास्त्र चा सखोल अभ्यास होता. त्याच्याशी वादविवाद करणे सोपे न्हवते. दुसरीकडे, भिखू नागसेन हे "अरहंत " पदावर पोहचलेले ...

समांतर ब्रम्हांड (Parallel universe)

  समांतर ब्रम्हांड (Parallel universe) समांतर ब्रम्हांड ही एक अद्भुत संकल्पना आहे. गेल्या काही वर्षात जेव्हा पासून कवांटम मेकॅनिक (quantum mechanics ) मध्ये अधिकाधिक संशोधन होत गेले , माणसाचे ब्रम्हांड कडे पाहण्याचा दृष्टिकोन पण बदलत गेला.. ब्रम्हांड हे एक रहस्य आहे. विज्ञानाने ब्रम्हाडचे रहस्य शोधायचा कितीही प्रयत्न केला ,तर हे ब्रम्हांड सदैव एक रहस्य म्हणून शिल्लक राहील, कारण सृष्टीला अंत नाही.. सृष्टी ही एक कोड किंवा रहस्य आहे.  आपण ज्या ब्रम्हांड ला ओळखतो ते ब्रम्हांड हे "बिग बँग" या महाविस्फोट पासून तयार झाले आहे, ही आतापर्यंतची माहिती आहे.. पण तरीही अनेक प्रश्न या अनुषगाने निर्माण होतात त्यातील एक प्रश्न असा की , "बिग बँग" पूर्वी काय होते ?? आपल्या ब्रम्हांड पलीकडे देखील ब्रम्हांड आहे का ?? जर ब्रम्हांड असेल तर त्याचा आणि आपल्या ब्रम्हांड चे काही संबंध आहे का ? किती ब्रम्हांड असतील ? एक महाकाय सिस्टीम च आपला ब्रम्हांड हा एक छोटासा भाग तर नसेल ?? असे अनेक प्रश्न निर्माण होतात.. समांतर ब्रम्हांड ही अशी संकल्पना आहे, की त्यात असे म्हटले आहे की आपल्या ब्रम्हांड ऐव...

ओलबर पॅराडॉक्स

  "ओलबर पॅराडॉक्स" आज आपण एक गमतीदार आणि रहस्यमयी "पॅराडॉक्स" पाहणार आहोत.  "पॅराडॉक्स" म्हणजे अशी गोष्ट ज्या मध्ये परस्पर विरोधी गोष्टी असतात.. एक गोष्ट किंवा घटना जी विरोधाभास ने भरलेले असते..त्यातील एक "ओलबर पॅराडॉक्स'.  तुम्हाला एक साधा प्रश्न विचारतो, पूर्ण लेख वाचायच्या अगोदर यावर विचार करा. "आपल्याला रात्री आकाश काळे का दिसते? किंवा वेगळ्या शब्दात मांडायच तर, आकाशातील तारे सोडल्यास बाकी अंधार का दिसतो ? तुम्हाला प्रश्न पडला असेल की "हा काय प्रश्न आहे का "?? पण मित्रहो , हा प्रश्न आहे व  एक पॅराडॉक्स आहे.. जर्मनीचे शास्त्रज्ञ हेनरीच ओलबर याना 18 व्या शतकात हा प्रश्न पडला होता. पॅराडॉक्स यासाठी कारण आकाश तर अनंत आहे आणि आकाशात अब्जावधी तारे व दीर्घिका (galaxy) आहेत. 18 व्य शतकात विज्ञान आज प्रमाणे विकसित न्हवते,मात्र त्यांचा प्रश्न बरोबर होता. जर आकाशात अब्जावधी तारे आहेत. जिथे आपण पाहू तिथे तारे आहेत,तर एक अशी छोटी जागा तरी "रिकामी" असेल का जिथे तारे नसतील ?  मग संपूर्ण (आपल्यासाठी दृश्य) ब्रम्हांड जर ताऱ्यानी भरले आ...

अष्ठावक्र श्लोक ५-४

 "अष्ठावक्र गीता" मधील एक श्लोक आणि त्याच अर्थ मी सादर करत आहे. श्लोक खूप सुंदर आहे.  "अष्ठावक्र गीता" एक अद्भुत पुस्तक आहे. हे पुस्तक वाचताना आपली प्रज्ञा जागृत होते, इतकी क्षमता या ग्रंथामध्ये आहे..  राजा जनक आणि महान संत "अष्ठावक्र" यांच्यात संवाद चालू असतो. त्यावेळी "अष्ठावक्र" हे खालील श्लोक म्हणतात.. "समदुःखसुख: पूर्ण आशानैराश्ययो: सम: | सम जीवित मृत्यू : सन्नेवमेव लयं व्रज " ।।५ -४।। अर्थ - " तू दुःख ला पण समतेने बघ, सुखला सुद्धा समतेने बघ, आशा (hope) ला समतेने बघ आणि नैराश्यलाही समतेने बघ...जीवन आणि मृत्यूलाही समतेने बघ.. जे जीवनात होत आहे त्याला जसे ते घडत आहे तसे बघ...(ते स्वीकार) आणि शांत हो..." Meaning in English -  ( equal in pain and in pleasure, Equal in hope and in Disappointment, Equal in life and Death, and Complete as you are, you go to your rest.) सुख,दुःख, आशा, नैराश्य, जीवन आणि मृत्यू या कोणत्याही स्थितीला जसे आहे तसे स्वीकारल्याने आपल्या मनावरील ओझे कमी होते.. हे कोणतेही भावना आणि परीस्थिती हे नैसर्गिक आ...

बेटेलजुस तारा

  बेटेलजुस (Betelgeuse) बेटेलजुस हा मोठा (giant) तारा असून तो पृथ्वीपासून 642 प्रकाशवर्ष इतका दूर आहे. आपल्या सौरमाले जवळील सूर्यापेक्षा प्रचंड मोठा तारा पैकी एक तारा आहे.   सूर्यापेक्षा अंदाजे 700 ते 800 पटीने मोठा हा तारा आहे. ओरियन (orian constellation) नक्षत्र मध्ये आपल्याला हा तारा सापडतो. ओरियन नक्षत्र हे आकाशात मिथुन राशी मध्ये साधारण 20 अंशवर  आहे. मृगशीर्ष नक्षत्र जो वृषभ आणि मिथुन मध्ये आहे त्या आसपास तुम्हाला आकाशात ही आकृती दिसेल. बेटेलजुस, रेगेल, बेलाट्रिक्स सारखे मोठे तारे या नक्षत्र मद्ये आहेत.  बेटेलजुस हा या साठी महत्वाचं तारा आहे कारण हा मरणासन्न अवस्थेला पोहचला आहे..आपल्या आयुष्याचा शेवटचा क्षण पर्यंत पोहचला आहे.. कोणताही मोठा तारा जेव्हा मरणासन्न अवस्थेला पोहचतो तेव्हा त्यामध्ये महाकाय स्फोट होतो. त्या स्फोटला "सुपरनोवा" म्हणतात. सुपरनोवा नंतर एकतर तो "ब्लॅक होल" होतो, नाहीतर एक "न्युट्रोन तारा" होतो. सुपरनोवा काय असते ?  कोणताही तारा जेव्हा शेवटच्या क्षणात असतो तेव्हा त्याचं आतील इंधन संपते. प्रत्येक तारा मध्ये दोन विरूद्ध "दाब...

अजित केसकंबल

  अजित केसकंबल अजित केसकंबल हे इसवी सण पूर्व सहाव्या शतकात प्रसिद्ध तत्वज्ञानी होऊन गेले. बुद्ध व महावीर यांचे ते समकालीन (एका काळातील) होते. काही भारतीय तत्वज्ञानी (indian philosopher) जसे की बुद्ध, महावीर, कृष्ण, कपिल मुनी इत्यादी हे प्रसिद्ध आहेत..  चार्वाक, अष्ठावक्र हे ठराविक लोकांना माहीत असतात. मात्र अजित केसकंबल, मखल्ली गोशाल, संजय बेलातीपुत्त हे खूप कमी लोकांना माहीत आहे. त्यांचा संप्रदाय देखील टिकला नाही ... ज्यांना साहित्य ची आवड आहे, त्यांना ही नावे माहीत असावीत... मला ही यांचा बद्दल कमी वाचायला मिळाले.. अजित केसकंबल यांचे तत्वद्न्यान अगदी सोपे आणि सरळ होते.. ते भौतिकवादी व नास्तिक विचाराचे होते. त्यांचे तत्वज्ञान असे होते की  "खा पीया मजा करा, पाप पुण्य असे काही नसते, पाप पुण्याचे फळ मिळत नाही,  माणूस मेल्यानंतर कसलाही हिशोब होत नाही, मृत्यू नंतर सर्व संपणार आहे, शरीर हे चार घटकांचे बनले आहे, शरीराचे हे चारही घटक मृत्यूनंतर राखेत मिसळणार आहे, आहे ते आयुष्य आनंदाने जगून घ्या, आत्मा हे शरीरापासून काही तरी वेगळं घटक आहे हे ते मानत न्हवते.. ""  अजित केस...

"सॉफ्ट ड्रिंक" आहारातून वजा करा

 "सॉफ्ट ड्रिंक" आहारातून वजा करा... सॉफ्ट ड्रिंक म्हणजे साखरयुक्त कार्बोनेटेड वॉटर. यात कोल्डड्रिंक , सोडा इत्यादी जे साखरयुक्त रंगीबेरंगी शीतपेये बाजारात उपलब्ध असतात त्यांचं  समावेश होतो.बाजारात आपल्याल विविध ब्रँड चे "कोल्डड्रिंक" मिळतात, मी कोणत्याही कंपनी चे नाव घेणार नाही. लहान मुले आणि मोठी माणसे देखील हल्ली "सॉफ्टड्रिंक" आवडीने पितात. अनेकांना पार्टी मध्ये सॉफ्ट ड्रिंक्स ठेवायला आवडते. कोल्डड्रिंक्स मधून येणारे बुडबुडे हे आकर्षक असतात. काही सेलिब्रिटी (लोकांनी सेलिब्रिटी लोकांना का डोक्यावर चढवलं आहे हे मला कळत नाही, कले पुरता याना महत्व द्यावे) लोक पण याची जाहिरात करत असतात. कोल्डड्रिंक पिणे ही फॅशन झाली आहे.   मात्र सॉफ्टड्रिंक (कोल्डड्रिंक) हे शरीराला जास्त हानिकारक असतात. दारू व सिगारेट पेक्षा हे हानिकारक आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.  आपल्या शरीराला अतिरिक्त साखरेची गरज नसते.  साध्या जेवणातून आपल्याला नैसर्गिक साखर लॅक्टोज, फ्रूक्टोज मिळत असते.तरीही मोठी माणसे 30 ग्रॅम साखर आणि लहान मुले 20 ग्रॅम पेक्षा कमी साखर  घेऊ शकतात आणि आपल्याला ...

डार्क मॅटर" आणि "डार्क एनर्जी"

  "डार्क मॅटर" आणि "डार्क एनर्जी" - दोन अदृश्य शक्ती आपली पृथ्वी, सुर्य, ग्रह, असंख्य तारे , दीर्घिका आणि जे जे पदार्थ स्वरूपात अस्तित्वात आहे, ते अवकाशात फक्त 5% आहे, असे जर मी म्हटले तर तुम्हाला आश्चर्य वाटेल की नाही ? आपण जे असंख्य आणि महाकाय खगोलीय पदार्थ अवकाशात पाहू शकतो ते फक्त 5 % आहे, मग इतर 95 % काय आहे ?? प्रश्न पडला ना !!!! ?? 95 % हे "डार्क मॅटर आणि डार्क एनर्जी" आहे.. "डार्क" या शब्दात च दडले आहे की ज्या बद्दल शास्त्रज्ञांना काही माहीत नाही. जे अवकाशात कार्यरत आहे आणि ज्याचा आपण अनुभव घेवू शकतो, मात्र त्याला आपण पाहू शकत नाही.. 1933 मध्ये स्विस शास्त्रज्ञ फ्रीट्झ झविकी हे "गलक्सी क्लस्टर" (दीर्घिका चे समूह) वर निरीक्षण करत होते. त्यांचे वस्तुमान मोजताना त्यांना असे लक्षात आले की "गलक्सी क्लस्टर" मध्ये जे दीर्घिका हे "क्लस्टर" चे टोकावर आहेत त्यांचा वेग जास्त आहे आणि वस्तुमान पण जास्त आहे,तरी ते "क्लस्टर" मधून आश्चर्यकारक रित्या बाहेर फेकले जात नाही.  कोणतीतरी अदृश्य शक्ती  ही दीर्घिकाना एकत्र ...

भूकंपाची कारणे

  भूकंपची (Earthquake) कारणे काय आहेत ? आज (6 feb 2023) तुर्की ( टर्की, तुर्कस्थान Turkey) या देशात 7.8 क्षमतेचा भूकंप झाला. या भुकंपचे कारण हे आहे की , "अरेबियन प्लेट" ही "अँटनियन प्लेट" ला ढकलल्याने "अँटनियन प्लेट" ही "युरेशियन प्लेट " वर आदळली आणि त्यामुळे भूकंप झालं. अशी जगात अनेक ठिकाणी भूकंप होत असतात. पृथ्वीवरील काही ठिकाणे ही भूकंप क्षेत्रे आहेत. भारतात ईशान्य भारत, हिमालय आणि काश्मीर हा जास्त क्षमतेचा भूकंप प्रदेश आहे. चिली,अल्साका, जपान, इंडोनेशिया इथे मोठे भूकंप घडले आहेत.. पृथ्वीचा पृष्ठभाग हा एक कवच आहे आणि ते कवच साधारण 100 ते 200 किमी आहे.या कवचला "लिथोस्फेर" म्हणतात. आपले पर्वत ,डोंगर, तलाव, महासागर, नद्या सर्व काही या कवच वरच आहे. हा कवच सलग नाही आहे तर तो विभाजित आहे..याला "टेक्टॉनिक प्लेट " अस म्हणतात .जसे की आफ्रिकन प्लेट, युरेशियन प्लेट, इंडियन प्लेट, नॉर्थ अमेरिकन प्लेट, साऊथ अमेरिकन, अंतर्टिका प्लेट , ऑस्ट्रेलियन प्लेट, पॅसिफिक प्लेट हे पृथ्वीवरील मोठे प्लेट आहेत  आणि या सोबत काही लहान प्लेट पण आहेत. हे ...

पृथ्वीच्या गर्भात "नर्क" आहे

  पृथ्वीच्या गर्भात "नर्क" आहे... आपली पृथ्वी ही आपल्याला बाहेरून शांत व सुंदर वाटते ,पण ती वास्तविक आतून अजिबात शांत नाही.. पृथ्वीच्या गर्भात किंवा अंतरंगात ती इतकी उष्ण व गरम आहे की एका क्षणात ती आपल्याला नष्ट करू शकते... ज्वालामुखी तून येणारा लाव्हारस हा फक्त झलक आहे..  आपण पृथ्वीच्या गर्भात जाऊच शकत नाही फक्त आपल्याकडे असलेल्या यंत्रणा ने आपण त्यांचा अभ्यास करू शकतो..आपण आपल्या सौरमालेच्या बाहेर अजून गेलो नाही. आपले "Voyager" यान आपण "सौर मालेच्या" बाहेर अनंताच्या प्रवास साठी सोडले आहेत..आपण जितकी माहिती आकाशबद्दल जाणून घेतली आहे, ती बहुतांश "हबल" दुर्बीण मुळे आणि आता "जेम्स वेब" मुळे जाणू शकलो आणि शकतो आहोत.  पण यात आपण आपल्या पृथ्वी बद्दल कितपत जाणतो आहोत ?? म्हणजे आपल्या पृथ्वीची निर्मिती कशी झाली ? पृथ्वीच्या गर्भात आहे काय ? भूकंप आणि ज्वालामुखी का घडतात? आपल्या पृथ्वीच्या भोवती चुंबकीय तरंग का आहे ? असे बरेच पृथ्वी संबंधित गोष्टी आहेत जे मानवाने जाणले आहे आणि अजून जाणणे आवश्यक आहे.. आपली पृथ्वी ही 4. 5 अब्ज वर्षपुर्वी निर्मित ...

चुंबन व यामागचे विज्ञान

  स्त्री पुरुषांनी एकमेकांच्या "ओठांचे चुंबन" (kiss)  घेणे, या मागचे विज्ञान काय आहे ? स्त्री आणि पुरुष मध्ये नैसर्गिक लैंगिक आकर्षण (sexual attraction) हे असते. त्यात विशिष्ट प्रकारचा स्त्री पुरुष, आवडी-निवडी आणि कित्येक वर्षाचा सहवास हे घटक परिणाम करतात. पण, आकर्षण हे असतेच असते. हे आकर्षण फक्त जोडीदार (couple) मध्येच असेल असे काही नाही, पुरुष किंवा स्त्रीला एकपेक्षा अधिक "विरोधी लिंगी व्यक्ती" विषयी आकर्षण असू शकते. हे जीवशास्त्रीय आणि मानसशास्त्र चे दृष्टिकोन ने नैसर्गिक मानले जाते. जेव्हा स्त्री-पुरुष एकत्र भेटतात तेव्हा त्यांच्यातील नैसर्गिक हावभाव आणि एकमेकांना आदर करण्याची पद्धत यामध्ये आकर्षण हे कार्यरत असते. या आकर्षण चा एक पद्धत म्हणजे "ओठावर चुंबन घेणे" हे होय. भारत सारख्या सांस्कृतिक देशात फक्त  नवरा-बायको, प्रियकर-प्रेयसी हे सेक्स पूर्वी "फोरप्ले" मध्ये आणि एकमेकांबद्दल प्रेम व्यक्त करण्यास चुंबन घेतात. इटली, फ्रान्स, नेदरलँड अशा मुक्त संस्कृती असलेल्या देशात तर स्त्री पुरुष (हे साधे मित्र-मैत्रीण असले तरी) एकेमकाना भेटल्यावर "...